Wednesday, November 16, 2011

******* अणिमा वर्ध्यात (सुरुवात) -- आजही द्वारका कादेबरी

----------------------------------------------------------------
साहेबांचा धाक राजकारणांत सर्वांनाच होता. त्यांचे कुशल नेतृत्व, प्रशासनावर पकड, जनतेच्या भल्यासाठी काय हवे आणि तेही नियमाच्या कक्षेत बसवून कसं देता येईल याबाबतची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. त्यामुळेच की कांय, जेंव्हा देशावर चिनी संकट आले आणि एका मुत्सद्दी व कर्तृत्ववान संरक्षण-मंत्र्याची गरज भासली तेंव्हा त्यांनाच दिल्लीत पाचारण करण्यांत आले. हा इतिहास आणि त्यांचे लघु-आत्मचरित्र अणिमाने वाचायला घेतले होते. होय, लघुच, कारण दीर्घ चरित्र वाचण्याइतके तिचे मराठी अजून पक्के झाले नव्हते.

देशांत आणिबाणिचे पर्व येऊन गेले तेंव्हा तिचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास आणि आय्एएस् परीक्षेची तयारी चालू होती. त्या काळांत तिला खूपदा प्रश्न पडला होता कि जर वरिष्ठ अधिकारी आणिबाणिला विरोध करू शकले नव्हते तर  त्यांना सजग अधिकारी कसं म्हणायचं ।
--------------------------------------------------------------------------------------